आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्यावर दाखल केलेले खोटे गुुन्हे मागे घ्यावेत अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे पदाधिकारी विनायक भिसे पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी बुधवारी ता. 3 निवेदनाद्वारे दिला आहे.
या संदर्भात शिवसेना पदाधिकारी विनायक भिसे पाटील यांच्यासह अविनाश चव्हाण, बाळू सरकटे, शिवाजी सरकटे, फैय्याज पठाण, सय्यद नईम, विजय इंगळे, प्रविण जाधव, राजू पाटील, सोनु डांगे, कृष्णा लोंढे, आसीफ पठाण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यामार्फत राष्ट्रपती भवनाकडे निवेदन सादर केले आहे.
शिवसेनेचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थाेरात यांच्याविरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुणे येथील प्रकरणातही त्यांचा संबंध नसतांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हिंगोली व पुणे येेथे दाखल झालेले गुन्हे राजकिय सुडापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गुन्हे तातडीने मागे घ्यावेत अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
या सोबतच वसमत येथेही शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर केले आहे. थोरात यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.