आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोलीत संत नामदेव महाराजांच्या पालखीचे रविवारी ता. 19 हिंगोली येथील नांदेड नाका भागात अग्रसेन चौकाजवळ जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी चार वाजता रामलीला मैदानावर झालेला पहिला रिंगण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला. यावेळी शेकडो भाविकांची उपस्थिती होती.
नरसी नामदेव येथील संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन शहरातील महाराजा अग्रसेन चौकामध्ये बॅण्ड, ढोलताशाच्या गजरात स्वागत झाले. यावेळी पालखीवर पुष्पवृष्टीने करण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावरून ही पालखी रामलिला मैदानावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पोहोचली. पालखीचे आगमन होताच लोकेश चैतन्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. अजय कुरवाडे, नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष दिलीपराव चव्हाण, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, माजी नगरसेवक श्रीराम बांगर, बिरजु यादव, अनिताताई सूर्यतळ, शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखाताई देवकते, माजी जि.प. सदस्या मंगला कांबळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख भानुदास जाधव, डॉ. रमेश शिंदे, अॅड. के.के. शिंदे, भिकाजी किर्तनकार, जि.प.चे माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, डॉ. विठ्ठल रोडगे, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, भरत चौधरी पहेलवान, परमेश्वर मांडगे, रामेश्वर मांडगे, सतिष शिंदे, सतिष लदनिया, डी.पी. शिंदे, संदीप घुगे, राजु अलमुलवार, नारायण खेडकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित महिला भाविकांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर पालखी सोहळ्याचे पहिले रिंगण पार पडले. डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी शेकडो भाविकांची उपस्थिती होती. या रिंगण सोहळ्यासाठी शिवसेना शहर प्रमुख अशोक नाईक, चंदु लव्हाळे यांच्यासह भाविकांनी पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.