आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:हिंगोलीत पत्नी नांदायला येत नाही म्हणून सासूचा खून

हिंगोली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमतच्या झेंडा चौक भागात कौटुंबिक वादातून जावयाने सासूचे दगडावर डोके आपटून खून केल्याची घटना सोमवारी (८ मे) पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी आरोपी जावयास ताब्यात घेतले आहे. शेवंताबाई वंजे (७५) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील कविता यांचा विवाह श्रीरामपूर तालुक्यातील टाकळी बाण येथील बाबासाहेब शिनगारे (४८) याच्यासोबत झाला होता. त्यांना एक पाच वर्षांची मुलगी आहे. मात्र मागील चार वर्षांपासून त्यांचे वाद होऊ लागले होते. त्यामुळे बाबासाहेब हा कविताला मारहाण करत होता. त्यामुळे कविता तिच्या मुलीसह वसमत येथे माहेरी राहण्यासाठी आली होती.

भांडण सोडवायला गेला अन् जीव गमावला
नांदेड -

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा आरोपीने दगडाच्या भिंतीवर ढकलून दिल्याने मृत्यू झाला. सुरेश साकळे असे मृताचे नाव आहे. ही घटना कंधारमधील सीतानगर येथे सोमवारी (८ मे) सकाळी ११.३० वाजता घडली. या प्रकरणातील आरोपी फरार आहे. नंदाबाई सुरेश साकळे यांच्या घराच्या शेजारी रेणुकाबाई मोगलाजी पवार व तिची नणंद गंगा मेटकर यांच्यात मुलाला कपडे घालण्याच्या कारणावरून वाद झाला. नंदाबाई व त्यांचा पती सुरेश साकळे भांडण सोडवण्यास गेले. यावेळी मोगलाजी पवारने सुरेश साकळे याच्या मानेत हात घालून त्यांना दगडाच्या भिंतीवर ढकलून दिले. यात सुरेश साकळे यांचा मृत्यू झाला.