आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्तता:हिंगोलीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बोल्डें यांची निर्दोष मुक्तता; न्यायालयाचा निकाल

हिंगोली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात कार्यरत असतांना पदाचा दुरुपयोग करून 1.71लाख रुपयांचा आर्थिक फायदा करून घेतल्याच्या आरोपातून तत्कालीन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. व्ही. बुलबुले यांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोलीचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बोल्डे यांनी औषधी खरेदीमघ्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर दुसऱ्या प्रकरणात त्यांनी शासकिय वाहन असतांनाही खाजगी वाहनाचे लॉकबुक दाखवून त्याचे देयक उचलत अपहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. सदर प्रकरणात तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

या प्रकरणात लाचलुचपतचे उपाधिक्षक सुनील जैतापूरकर यांच्या पथकाने गोपनिय चौकशी केली होती. त्यानंतर झालेल्या उघड चौकशीत काही बाबी स्पष्ट झाल्या होत्या. त्यावरून जैतापूरकर यांनी ता. 2 सप्टेंबर 2016 रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये डॉ. बोल्डे यांनी पदाचा दुरुपयोग करून खाजगी वाहनाद्वारे दौरे दाखवून 1.71 हजार रुपयांचा आर्थिक फायदा करून घेतल्याचे तक्रारीत नमुद केले होते. यावरून डॉ. बोल्डे यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनयमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

सदर प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश पी. व्ही. बुलबुले यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते. प्रकरणात 11 साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने डॉ. बोल्डे यांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचा निकाल दिला आहे. प्रकरणात डॉ. बोल्डे यांच्या वतीने अॅड. मनिष साकळे यांनी काम पाहिले त्यांना ॲड. अविनाश बांगर, ॲड. एस. एस. थोरात यांनी सहकार्य केले.