आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार बंडू जाधव यांनी टोचले ठाकरेंचे कान:उद्धव व आदित्य या दोघांनीच खुर्च्या आटवल्यामुळे शिवसेनेत गद्दारी झाली

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंडखोरी करणारे ४० आमदार उद्धव ठाकरेंच्या कारभारावर आजवर टीका करत होते. मात्र आता ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेले परभणीचे खासदार संजय (बंडू) जाधव यांनीही आपल्या पक्षप्रमुखांना जाहीर मेळाव्यातून खडे बोल सुनावले.‘जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते तर त्यांनी आदित्य यांना मंत्री करायला नको होते, अन‌् त्यांना मंत्री करायचेच होते तर स्वत: मुख्यमंत्री व्हायचे नव्हते. कारण पक्षाचे नेतृत्व कुणाकडे तरी हवे होते. पण या दोघांनी खुर्च्या आटवल्या त्यामुळे गद्दारी झाली. बाप गेल्यानंतर मुलगा माझ्या बोकांडीवर बसेल. त्यापेक्षा वेगळी चूल मांडली तर मग काय बिघडले? या भावनेतून पक्षात गद्दारी झाली,’ असे स्पष्ट मत जाधव यांनी शनिवारी व्यक्त केले. औंढा नागनाथ येथे शिवगर्जना यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. सत्तेत आम्हाला अपेक्षित वाटा मिळाला नसल्याचे दु:खही त्यांनी व्यक्त केले.

उद्धव यांनी पक्षाकडे लक्ष दिले नाही म्हणून चोरांना संधी खा. बंडू जाधव शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा होती, पण त्यांनी वेळोवेळी खंडन केले. आता ते पक्षाचे मेळावे घेत आहेत. ठाकरेंच्या चुकांवर बोट ठेवताना ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंनी पक्षाकडे फार लक्ष दिले नाही. इतर कुणालाही अधिकार दिले नाही. त्यामुळेच हा प्रसंग ओढवला व ४० चोरांना संधी मिळाली, असेही जाधव म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...