आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:लाच प्रकरणात ‘ते’ अभियंते कार्यमुक्त

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत तालुक्यातील अकोली येथे घरकुलाचा तिसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तसेच लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांना सेवेतून कार्यमुक्त केले आहे. याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी काढले.

एका लाभार्थीच्या बँक खात्यात घरकुलाचा तिसरा हप्ता जमा करण्यासाठी वसमत पंचायत समितीचा कंत्राटी अभियंता शेख समीर शेख खैसर याने दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच अन्य कंत्राटी अभियंता करीम कुरेशी शादुल्ला याने लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले. दरम्यान, १० हजारांची लाच घेताना अभियंता शेख समीरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी शेख समीर व लाच देण्यासाठी प्रोत्साहन देणारा अभियंता करीम कुरेशी यांच्याविरुद्ध वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोन्ही कंत्राटी अभियंत्यांना कंत्राटी सेवेतून कार्यमुक्त केले असल्याचे कळवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...