आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:वसमतमध्ये सापडले तीन महिन्यांचे मृत अर्भक; दोन महिलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

हिंगोेली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत येथील सम्राट कॉलनी भागात गुरुवारी (16 जून) दुपारी एका नालीमध्ये तीन महिन्यांचे अर्भक मृतावस्थेत आढळून आले. या प्रकरणात पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील सम्राट कॉलनी भागात एका नालीमध्ये पिशवीत बांधलेले एक अर्भक आढळून आले. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर वसमत पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार शेख नय्यर, भगीरथ सवंडकर, पोले यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत अर्भक ताब्यात घेऊन वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सदर अर्भक स्त्री जातीचे किंवा पुरुष जातीचे आहे याची शाहनिशा केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली. यामध्ये दोन महिलांनी सदर पिशवी नालीमध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून त्यात एक महिला त्या अर्भकाची आई असून, दुसरी महिला त्या महिलेची आई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात अधिक चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...