आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:वसमत पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या टोळीतील तीन जणांना केली अटक

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वसमत ते नांदेड मार्गावर साई मंदिराजवळ गाईची तस्करी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी तीन जणांना रविवारी (१८ डिसेंबर) दुपारी ४ वाजता हट्टा शिवारातून अटक करण्यात आली.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत पोलिसांच्या पथकाने १० डिसेंबर रोजी पहाटे संशयावरून एका वाहनाचा पाठलाग सुरू केला होता. यावेळी वाहनातील पाच जणांच्या टोळक्याने पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे यांच्या पथकावर दगडफेक केली. या प्रकरणात एक पोलिस कर्मचारी शिवाजी पतंगे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर ही पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला असता वाहन उलटले. त्यामध्ये गाई असल्याचे आढळून आले. मात्र वाहनातील सर्व जण फराळ झाले. या प्रकरणात वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये आरोपींच्या अटकेसाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम उपनिरीक्षक बाबासाहेब खार्डे, जमादार केशव गारोळे, शंकर हेंद्रे, विवेक गुंडरे, भगीरथ सवंडकर, प्रशांत मुंढे यांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने वाहन मालकास ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली होती.

गुप्त माहितीच्या आधारे हट्टा शिवारात केली कारवाई तिघेजण वसमत येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पथकाने हट्टा शिवारात थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी तिघांना अटक केली. गजानन वाघमारे, सुरेश ऊर्फ पिंट्या खिल्लारे, वसीम कुरेशी (सर्व रा. परभणी) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली असता वसीम कुरेशी हा पाठीमागे बसून पोलिसांवर दगडफेक करत असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरीत दोघांचा शोध सुरू केला आहे. त्यांच्याकडून जनावर तस्करींची अनेक प्रकरणी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...