आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:दारू पकडून देणाऱ्या महिलेवर दगडफेक; दोघा जणांविरूद्ध गुन्हा दाखल

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथे बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची मुजोरी वाढली असून दारू पकडून देणाऱ्या महिलेवर दगडफेक करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. १) रात्री दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील येडशी तांडा येथे बेकायदेशीर दारू विक्रीमुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ लागले आहेत. या प्रकारामुळे गावातील बेबाबाई साहेबराव जाधव या महिलेने दारू विक्रेत्यांची दारू पोलिसांना पकडून दिली. या प्रकारामुळे दारू विक्रेत्यांचे पित्त खवळले. आमची दारू पोलिसांना का पकडून दिली या कारणावरून त्यांनी बेबाबाई जाधव व इतरांवर दगडफेक करून त्यांना जखमी केले. बेबाबाई यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिसांनी पांडू चिमणा जाधव, राजू ऊर्फ बाळू लक्ष्मण जाधव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सात दिवसांत केल्या १५२ केसेस
जिल्ह्यात पोलिस विभागाने ७ दिवसांत विशेष मोहीम हाती घेतली. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या मोहिमेत १५२ केसेस करण्यात आल्या असून ३ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...