आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:बँकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने‎ विहिरीत उडी मारून केली आत्महत्या‎, कळमनुरी तालुक्यात घडली घटना

हिंगाेली‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी तालुक्यातील कांडली‎ येथील शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून‎ ‎ शेतातील विहिरीत‎ ‎ उडी मारून‎ ‎ आत्महत्या‎ ‎ केल्याची घटना‎ ‎ रविवारी (१२‎ ‎ मार्च) पहाटे ६‎ ‎ वाजता उघडकीस‎ ‎ आली. नीळकंठ‎ पुंडलिकराव पतंगे (४७) असे मृत‎ शेतकऱ्याचे नाव आहे.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎ कळमनुरी तालुक्यातील कांडली‎ येथील शेतकरी नीळकंठ पतंगे‎ यांच्याकडे पाच एकर शेत जमीन‎ आहे.

या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा‎ उदरनिर्वाह चालतो. त्यांनी स्टेट बँक‎ ऑफ इंडिया शाखा आखाडा‎ बाळापूर येथून १.५० लाख रुपयांचे‎ कर्ज घेतले. मात्र अतिवृष्टीमुळे‎ खरीप हंगामात पिकांचे नुकसान‎ झाले. तर रब्बीमधील हरभऱ्याचे‎ पीकही जेमतेमच आले. तर सध्या‎ शेतात उन्हाळी सोयाबीनही म्हणावे‎ तसे आलेच नाही. त्यामुळे कर्ज कसे‎ फेडावे याची चिंता त्यांना लागली‎ होती. या सोबतच त्याच्या पायावर‎ शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक असून‎ त्यासाठी ५ लाखांचा खर्च येणार‎ होता. बँकेचे कर्ज व शस्त्रक्रियेचा‎ खर्च करावा करावा यामुळे ते‎ अस्वस्थ होते. दोन दिवसांपूर्वी ते रात्री‎ बेपत्ता झाले. त्यामुळे त्यांच्या‎ कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी त्यांचा शोध‎ सुरू केला होता. त्यांचे दुचाकी वाहन‎ व चष्मा शेतातील विहिरीजवळ‎ सापडल्यामुळे गावकऱ्यांनी शनिवारी‎ पहाटे पासून त्यांचा विहिरीत शोध‎ सुरू केला होता. दोन ते तीन विद्युत‎ पंपांद्वारे विहिरीतील पाणी काढण्यास‎ सुरुवात केली. त्यानंतर आज पहाटे‎ सहा वाजता त्यांचा मृतदेह विहिरीत‎ आढळून आला. घटनेची माहिती‎ मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर‎ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस‎ निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड,‎ उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार‎ नागोराव बाभळे यांच्या पथकाने‎ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.‎ याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस‎ ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू‎ होती. मृत नीळकंठ पतंगे यांच्या‎ पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना,‎ नातवंडे असा परिवार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...