आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या वाहनांसाठी 5.63 रुपये किलोमीटरला दर:सावरखेडा ते वारंगा मार्गावर पाच एप्रिलपासून टोलवसुली करणार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावरखेडा ते वारंगा या राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना आता ५ एप्रिलपासून टोल द्यावा लागणार आहे. एक किलोमीटर अंतरासाठी लहान वाहनांना १.७० पैसे, तर मोठ्या वाहनांसाठी ५.६३ रुपये टोल भरावा लागणार आहे. वाशिम ते वारंगा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर ठिकठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले. या मार्गामुळे वाहनांचा वेग वाढला असून पूर्वी आखाडा बाळापूर, वारंगासाठी १ ते दीड तास लागत होता. आता केवळ ४५ मिनिटांमध्ये आखाडा बाळापूर येथे पोहोचणे शक्य आहे. दरम्यान, या मार्गावर कामठा फाटा शिवारात टोल नाका उभारण्यात आला आहे. या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांसाठी टोलची रक्कमही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ठरवण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातील व्यावसायिक वाहनासाठी ४० ते २५० रुपये टोल द्यावा लागणार आहे. हिंगोली तालुक्यातील सावरखेडा बासपास ते वारंगा फाटा या ४७ किमी अंतरासाठी टोल घेतला जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालय वाशिमचे प्रकल्प अधिकारी राकेश जवादे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले आहे.