आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याचार:सोशल मीडियाद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरालगत बोळसोंड भागात फेसबुकद्वारे झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका तरुणासह दोघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी (३ सप्टेंबर) रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, जवळाबाजर येथील एक तरुणी मागील काही वर्षांपासून हिंगोली शहरालगत बळसोंड भागात राहण्यासाठी आली होती. या वेळी त्या तरुणीची फेसबुकद्वारे जुनेद शमीउल्लाखाँ पठाण (रा. पेन्शनपुरा, हिंगोली) याच्यासोबत ओळख झाली.

जुनेदने त्या तरुणीसोबत फेसबुकद्वारे चॅटिंग करून ओळख वाढवली व तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जुनेदने त्या तरुणीला लग्नाचे आमिषही दाखवले. लग्नाच्या आमिषाला बळी पडलेल्या त्या तरुणीवर जुनेदने एक वर्षापासून अत्याचार केले.मागील काही दिवसांपासून तो त्या तरुणीला मारहाणही करत होता. तर जुनेदचा भाऊ अजमत शमीउल्लाखाँ पठाणने त्या तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली. तरुणीने शनिवारी रात्री फिर्याद दाखल केली आहे

बातम्या आणखी आहेत...