आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कळमनुरी ते हिंगोली मार्गावर मसोड फाटा येथील ट्रॅक्टर उलटल्याने झाला अपघात ; 1 जण ठार 3 जण गंभीर जखमी

हिंगोली20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळमनुरी ते हिंगोली मार्गावर मसोड फाटा येथील ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी तारीख पाच पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संजय यल्लप्पा बाभुळकर असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मसवड येथील संजय बाभुळकर, शिवाजी बाभुळकर, अरबाज पठाण, करण तावडे हे आज सकाळी चार वाजण्याच्या सुमारास मसोड येथून ट्रॅक्टरने कलमनुरी कडे कामासाठी येत होते. यावेळी मसोड फाट्याजवळ भरधाव वेगाने धावणारे ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटले. या अपघातात संजय बाभुळकर ( 19 ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर शिवाजी बाभुळकर अरबाज पठाण करण तावडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूनील निकाळजे, जमादार रोहिदास राठोड, गुहाडे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅक्टर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. मयत संजय बाभुळकर याच्यावर कळमनुरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केली जात आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...