आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा रास्ता रोको:औंढा-जिंतूर मार्गावरील वाहतूक 2 तास ठप्प

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यात वीजपुरवठा सुरळीत करावा यासह इतर मागण्यासाठी शिवसेनेतर्फे (ठाकरे गट) सोमवारी (५ डिसेंबर) दुपारी बारा वाजता आैंढा ते जिंतूर रोडवर रामेश्वर येथील ३३ केव्ही उपकेंद्रासमोर रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. तालुक्यात सक्तीने सुरू असलेली वीज देयक वसुली थांबवावी, वीजपुरवठा सुरळीत करावा, शेतीपंपासाठी दिवसा वीजपुरवठा करावा या प्रमुख मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, उपजिल्हाप्रमुख जी.डी. मुळे, उपजिल्हाप्रमुख अनिल कदम यांच्यासह संपर्कप्रमुख सुनील काळे, तालुकाप्रमुख गणेश देशमुख, बाजार समितीचे संचालक बबनराव इघारे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी वीज कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नितीन पाटील, नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...