आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राणवायू जीवनासाठी महत्त्वाचा असून त्यासाठी वृक्ष लागवड होणे आवश्यक आहे. त्यासाठी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी वृक्ष प्रसाद योजना सुरू करणार असल्याची माहिती अभिनेता सयाजी शिंदे यांनी शुक्रवारी (९ डिसेंबर) टोकाईगड (ता. वसमत) येथे दिली.
कुरुंदा येथील टोकाई गडावर राज्यातील पहिला वृक्ष जागर कार्यक्रम झाला. यावेळी अभिनेता सयाजी शिंदे, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री कल्पना सैनी, सह्याद्रीचे सचिन चंदने, स्मिता जगताप, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, मुंजाजीराव इंगोले, रामदास पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी टोकाई गडावर टोकाई देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये नागरिक सहभागी झाले होते. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रातील नष्ट झालेले देशी वृक्ष पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जवळपास ४० ठिकाणी सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.