आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार:हिंगोली हळद बाजारात साडेबारा हजार पोत्यांची आवक, 6 हजार ते 8 हजार 300 रुपये क्विंटलचा भाव

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील संत नामदेव हळद बाजारमध्ये सोमवारी (४ एप्रिल) दुपारपर्यंत तब्बल साडेबारा हजार पोत्यांची आवक झाली. विशेष म्हणजे मागील चोवीस तासांपासून शेतकरी वाहने घेऊन रांगेत उभे होते. सध्या हळदीला ६ हजार ते ८ हजार ३०० रुपये क्विंटल दर मिळू लागला आहे.

हिंगोली येथील संत नामदेव हळद बाजार हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हळदीचे तातडीने बीट व वजन होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील काही भागातून या ठिकाणी हळद विक्रीसाठी आणली जाते. दरम्यान, हळदीची आवक लक्षात घेता बाजार समितीने सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवसांतच हळद खरेदीचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बाजारात दहा इलेक्ट्रॉनिक वजन काटेदेखील लावण्यात आले आहेत. मात्र बाजारात हळदीची आवक लक्षात घेता हे काटेदेखील कमी पडू लागले आहेत.

दरम्यान, आज सकाळीच वाहनांचा नंबर लागावा यासाठी रविवारी (३ एप्रिल) दुपारपासूनच शेतकरी वाहनामध्ये हळदीचे पोते घेऊन आले होते. त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

वजनकाटे वाढवण्याचे प्रयत्न
हिंगोलीच्या बाजारात आता हळदीची वाढती आवक होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच हळदीचे वजन लवकरात लवकर व्हावे यासाठी वजनकाटे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच बीट लवकर सुरू करण्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहे. - नारायण पाटील, सचिव, बाजार समिती हिंगोली.

हिंगोली : हळद बाजारामध्ये हळदीची आवक वाढली असून बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर वाहनांच्या रांगा लागल्या.

बातम्या आणखी आहेत...