आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळद खरेदी-विक्री:हिंगोलीच्या हळद बाजारामध्ये तब्बल साडेबारा हजार पोत्यांची आवक, वाहनांच्या रांगा

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील संत नामदेव हळद बाजार मध्ये सोमवारी ता. 4 दुपारपर्यंत तब्बल साडेबारा हजार पोत्यांची आवक झाली आहे. विशेष म्हणजे मागील चोवीस तासापासून शेतकरी वाहने घेऊन रांगेत उभी होती. सध्या हळदीला 6000 ते 8300 रुपये क्विंटल दर मिळू लागला आहे.

हिंगोली येथील संत नामदेव हळद बाजार हळद खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी हळदीचे तातडीने बीट व वजन होऊन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील काही भागातून या ठिकाणी हळद विक्रीसाठी आणली जाते.

दरम्यान हळदीची आवक लक्षात घेता बाजार समितीने सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवसातच हळद खरेदीचा निर्णय घेतला आहे. याशिवाय बाजारात दहा इलेक्ट्रॉनिक वजन काटे देखील लावण्यात आले आहेत. मात्र बाजारात हळदीची आवक लक्षात घेता हे काटे देखील कमी पडू लागले आहेत.

दरम्यान आज सकाळीच वाहनांचा नंबर लागावा यासाठी रविवारी ता. 3 दुपारपासूनच शेतकरी वाहनामध्ये हळदीचे पोते घेऊन आले होते. त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे या ठिकाणी वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भोजनाचे डबे देखील सोबत आणले होते.

दरम्यान आज बाजारपेठेत साडेबारा हजार पोते हळदीचे आवक लक्षात घेऊन बाजार समितीने दुपारी बीट सुरू केले आहे. हिंगोलीच्या हळद बाजारात हळदीला सहा हजार ते 8300 रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे.

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी वजन काटे वाढविण्याचे प्रयत्न

हिंगोली च्या बाजारात आता हळदीची वाढती आवक होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच हळदीचे वजन लवकरात लवकर व्हावे यासाठी वजन काटे वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच बीट लवकर सुरू करण्याबाबत व्यापाऱ्यांशी चर्चा करणार आहे. अशी प्रतिक्रिया हिंगोली बाजार समीताचे सचीव नारायण पाटील यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...