आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:हिंगोलीच्या गस्ती पथकाने वाचवले दोन जणांचे प्राण, औंढा मार्गावरील अपघात; गुन्हे शाखेची मदत

हिंगाेली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी पथकाला गुरुवारी (८ डिसेंबर) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पिंपरी फाटा येथे रस्त्याच्या बाजूला उलटलेल्या कारमधून विदर्भातील दोन जखमींना सुखरूप बाहेर काढून त्यांना वेळीच औषधोपचारासाठी पाठवले. त्यामुळे दाेघांना जीवदान मिळाले.

चाेरी, दराेडे, गुटखा व वाळू तस्करी वाढल्याने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गस्तीपथके स्थापन केली आहेत. पथकांना दररोज वेगवेगळ्या मार्गावर गस्त घालण्याबाबत सूचनाही दिल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, जमादार गजानन पोकळे, विठ्ठल काळे, दिनकर बांगर, कुमार मगरे, सोपान थिटे व शेख जावेद यांचे पथक तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार सचिन गोरले, विजय घुगे यांची औढा नागनाथ व वसमत मार्गावर गस्तीबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ही पथके गस्त करून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हिंगोलीकडे निघाले. दरम्यान, औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर पिंपरी फाट्याजवळ रस्त्याच्या बाजूने वाचवा..वाचवा असा आवाज एेकू आला. त्यामुळे पथकाने पोलिसांनी या अपघातग्रस्त कारच्या खिडकीचा काच फोडून त्यातील दोघांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना धिर देऊन पोलिस वाहनातून उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. राम भाग्यवंत व गोपाल खोतकर (रा. वेणी, ता. लोणार, जि. बुलढाणा) अशी दोघांची जीवदान मिळालेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...