आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपती संभाजीनगर ते कन्नड मार्गावरील घटना:दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ब्रेक दाबताच कार उलटून महिला ठार, पाच जण जखमी

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगर ते कन्नड मार्गावर दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी कारचे ब्रेक दाबल्याने कार उलटून झालेल्या अपघातात औंढा नागनाथ येथील एक महिला ठार झाली तर पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी घडला. मीना तेजकुमार झांजरी (६०, रा. औंढा नागनाथ) असे अपघातात मृताचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील झांजरी कुटुंबातील चौघेजण आज दुपारी कारने कन्नड येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांची कार कन्नड जवळ पोहोचली. त्यावेळी अचानक दुचाकीस्वार कारसमोर आला. यावेळी त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने कारचे ब्रेक दाबले. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटली.

या अपघातामध्ये कारमधील मीनाताई तेजकुमार झांजरी यांचा मृत्यू झाला. तर तेज कुमार झांजरी, जयकुमार झांजरी, मीना जयकुमार झांजरी, मंजुषा झांजरी व चालक किरण सोळंके हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गाव घेतली अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान मृत मीनाताई तेजकुमार झांजरी यांच्या पार्थिवावर शनिवारी (ता. ८) सकाळी दहा वाजता औंढा नागनाथ येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मृत मीनाताई झांजरी यांच्या पश्चात पती, एक मुलगा एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे.