आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:असोला शिवारात असलेल्या कालव्याच्या पाण्यात दोन युवक गेले वाहून, चुलत बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी ऑटोने आसोला येथे आले होते

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील असोला शिवारात असलेल्या कालव्याच्या पाण्यात दोन युवक वाहून गेल्याची घटना मंगळवारी (५ एप्रिल) दुपारी २ वाजता घडली. कपिल बाबुराव गायकवाड व तेजस मनोज खंदारे ( रा. वाई गोरखनाथ, ता. वसमत) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील तेजस, कपिल व अन्य दोघे जण तेजस खंदारे यांच्या चुलत बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी आज ऑटोने आसोला येथे आले होते. त्या ठिकाणी पत्रिका वाटप करून चौघेही परत गावाकडे निघाले.

मात्र आसोला शिवारातील पूर्णा पाटबंधारे विभागाच्या कालव्यात कपिल व तेजस दोघे जण पाणी पिण्यासाठी उतरले. मात्र पाणी पीत असताना दोघांचाही पाय घसरला आणि दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यावेळी त्यांच्यासोबत असलेले इतर दोघांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत दोघेही दिसेनासे झाले. कालव्याच्या पाण्यात कपिल व तेजस यांचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...