आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविड लढा:कोविडअंतर्गत उपाययोजनांची यूएनडीपी पथक करणार पाहणी, राज्यभर दाैरा करून घेतला जाणार आढावा

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात आरोग्य विभागाच्या वतीने कोविडअंतर्गत केलेल्या उपाययोजनांची तसेच विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अधिकाऱ्यांचे पथक सध्या राज्याच्या दाैऱ्यावर आहेत. या पथकाकडून आर्थिक आढावा घेतला जाणार आहे. राज्यात कोविडमध्ये रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत तसेच रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या. यामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता भासल्यास लिक्विड ऑक्सिजन टँक तसेच हवेतून तयार होणाऱ्या ऑक्सिजनचे यंत्र रुग्णालय मध्ये उपलब्ध करण्यात आले. यासोबतच बेडची उपलब्धता, पुरेसा औषधी साठा, इंजेक्शन्स व इतर औषधीदेखील उपलब्ध करण्यात आली. यासाठी शासनाने इमर्जन्सी कोविड रॅपिड प्रोग्रामअंतर्गत कोट्यवधीचा निधीदेखील उपलब्ध करून दिला. संपूर्ण राज्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या ९९१ कोटी रुपयांपैकी ५४८ कोटी २४ लाख रुपयांचा निधी राज्यातील जिल्ह्यांना देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात १२७ कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात ३२१ कोटी ५८ लाख रुपये, तर तिसऱ्या टप्प्यात ९९ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी राज्यातील सर्व जिल्ह्यांना उपलब्ध केला आहे. या निधीमधून उपाययोजनांसाठी दिलेल्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांनी निधी खर्चदेखील केला. दरम्यान, राज्यात इमर्जन्सी कोविंड रॅपिड प्रोग्राम २ अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याने केलेल्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या अधिकाऱ्यांचे पथक राज्यातील सर्व जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. यासंदर्भात केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अपर सचिवांनी राज्याला पत्र पाठवले असून त्यावरून राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व शासकीय रुग्णालयांना पत्र पाठवले. राज्यात जिल्हानिहाय वितरित केलेला निधी नाशिक २९ कोटी ७९ लाख, धुळे १० कोटी, जळगाव ६ कोटी, नंदुरबार ८ कोटी ९० लाख, अहमदनगर १९ कोटी २५ लाख, सोलापूर १४ कोटी २० लाख, औरंगाबाद ११ कोटी ४५ लाख, जालना १२ कोटी ४३ लाख, परभणी १० कोटी ७४ लाख, हिंगोली दहा कोटी, लातूर बारा कोटी २६ लाख, बीड १६ कोटी ११ लाख, नांदेड ३६ कोटी ८७ लाख, उस्मानाबाद १५ कोटी ३१ लाख, अकोला सहा कोटी ७२ लाख, अमरावती ४३ कोटी ४९ लाख, बुलडाणा ३४ कोटी ६० लाख, वाशीम आठ कोटी ७२ लाख, यवतमाळ १० कोटी २३ लाख, वर्धा नऊ कोटी ५८ लाख, गोंदिया सात कोटी ४१ लाख.

बातम्या आणखी आहेत...