आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीवनी कृषी महोत्सव:केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंच्या हाती पुन्हा ट्रॅक्टरचे स्टेअरिंग; परभणीत ठाकरे सरकारवर टीकास्त्र

परभणी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीच्या संजीवनी कृषी महोत्सवावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ट्रक्टरचे स्टेअरिंग हाती घेण्याचा मोह पुन्हा एकदा आवरता आला नाहीये. यावेळी त्यांनी लहान आणि मोठे दोन्ही ट्रक्टर चालवले. यामुळे उपस्थित अवाक् झाले.

रावसाहेब दानवे हे नेहमीच अशा अनेक गोष्टीमुळे चर्चेत असतात. कधी ते दुचाकीवरून गावात फेरफटका मारतात तर कधी कार्यकर्त्याचे ट्रक्टर घेत मतदारसंघात फिरताना दिसून येत असतात. तसे रावसाहबे दानवे हे राजकारणातील एक अवलिया व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात.

पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपला फाटका शर्ट जाहीरपणे दाखवत आपल्या साधेपणाचा पुन्हा एकदा परिचय दिला होता. अनेकदा त्यांच्या भाषेमुळेही ते चर्चेत येत असतात. लोकांमध्ये मिसळणे, त्यांची बोली बोलणे आणि त्यांच्या सारखेच राहणे ही दानवे यांची खासियत. त्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहतात. त्यांचे शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करतांनाचे फोटो यापुर्वी अनेकदा समोर आले आहेत. बैलगाडी, ट्रॅ्क्टर, शेतात स्वयंपाक, आणि घोड्यावरची रपेट असे अनेक गोष्टीमुळे रावसाहेब दानवे नेहमी चर्चेत असतात.

दानवेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आज परभणी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी ट्रक्टर चालवून झाल्यानंतर रावसाहेब दानवेंनी पत्रकाराशी संवाद साधला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ओबीसी आरक्षणांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी दोन वर्षांपासून कोर्टाने एम्पिरिकल डाटा मागितला असताना हे सरकार देऊ शकलेले नाही. ते म्हणाले, हे सरकार सर्व ठिकाणी अपयशी ठरले आहे. अपयशी ठरले की केंद्राकडे बोट दाखवतात.

बातम्या आणखी आहेत...