आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Valentine Day 2022:'प्रिय राजीवजी, माझे आजही तुमच्यावर प्रेम..' व्हॅलेंटाईन दिनी प्रज्ञा सातव यांची भावूक पोस्ट

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. या दिवसाला प्रेमाचा दिवस म्हणून ओळखले जाते. आजच्या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांसोबत प्रेम व्यक्त करतात. याच व्हॅलेंटाईन डे निमित्त काँग्रेसच्या खासदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये प्रज्ञा सातव यांनी भावुक पोस्ट केली आहे. त्यामुळे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. गेल्यावर्षी कोरोनामुळे 16 मे रोजी पुण्यात राजीव सातव यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतरचा प्रज्ञा सातव यांचा हा पहिलाच व्हॅलेंटाईन असून, त्यांनी राजीव सावत यांच्या आठवणीत भावुक पोस्ट लिहली आहे.

प्रज्ञा सातव यांनी काय पोस्ट केली?

प्रज्ञा सातव ट्विट करत लिहले आहे की, 'प्रिय राजीव जी, या व्हॅलेंटाईन डे ला तुम्ही जिथे कुठेही असाल तरी मला तुम्हाला सांगायचे आहे की, मी कालही तुमच्यावर प्रेम करत होते. आजही मी तुमच्यावर प्रेम करते आणि मी उद्याही तुमच्यावर प्रेम करेल. मी कायम तुमच्यावर प्रेम करत राहीन.' अशी भावुक पोस्ट प्रज्ञा सातव यांनी राजीव सातव यांच्या आठवणीत केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी पती राजीव सातव यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. 2002 साली राजीव सातव आणि प्रज्ञा सातव विवाह बंधनात अडकले होते. दोघांनी दोन मुलं आहेत. 19 वर्षांच्या संसारानंतर गेल्या वर्षी कोरोनाने राजीव सातव यांचे पुण्यात निधन झाले. पत्नी आणि मुलांना सोडून राजीव सातव या जगातून निघून गेले. आज प्रेमाच्या दिवशी प्रज्ञा सातव यांनी आपल्या पतीबद्दल प्रेम व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

16 मे 2020 ला झाले होते राजीव सातव यांचे निधन

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे 16 मे रोजी कोरोनामुळे पुण्यात निधन झाले होते. कोरोना संसर्गानंतर राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र कोरोना उपचारादरम्यान राजीव सातव यांचा मृत्यू झाला होता.

राजीव सातव यांना लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मिळाले होते. त्यांच्या आई रजनीताई सातव या स्वत: राज्य मंत्रिमंडळात मंत्री होत्या. दरम्यान, 1999 साली राजीव सातव हे आपली आई रजनीताई सातव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होते. मात्र, नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आपले एक स्वत:चे स्थान निर्माण केले होते. आमदार म्हणून त्यांनी विधानसभेत हिंगोली मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. 2014 साली हिंगोलीचे खासदार म्हणून राजीव सातव हे पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते.

बातम्या आणखी आहेत...