आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंत्राटदाराविरोधात रास्तारोको:हिंगोली तालुक्यातल्या रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक

हिंगोली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग निर्मितीसाठी उत्खनन खोदून वाहतूक करताना हिंगोली तालुक्यातील रस्ते खड्डेमय झाले असून, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय व मोंन्टोकार्लो कंपनीच्या विरोधात गुरुवारी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे नांदेड ते हिंगोली मार्गावरील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

गावकऱ्यांची होते कसरत

अकोला ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर हिंगोली तालुक्यात झालेल्या कामांसाठी परिसरातील ग्रामीण भागांमधून मोठ्या प्रमाणावर मुरूम वाहतूक करण्यात आली. दररोज शेकडो ब्रास गौण खनिजाची वाहतूक केली जात होती. त्यामुळे अनेक गावाकडील रस्ते खड्डेमय झाले आहेत. यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करताना गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

रास्ता रोको आंदोलन

अंभेरी, ईसापूर लासीना, बासंबा , परिसरातील ग्रामस्थांनी खानापूर पाटीजवळ इसापूर येथील सरपंच पांडुरंग जगताप यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी गणेश मुंडे, नंदू पातळे, विलास जगताप, विनोद राठोड, तुकाराम जगताप, प्रल्हाद राठोड, दत्‍ता राठोड यांच्यासह गावकरी उपस्थित होते.

हिंगोली नांदेड मार्गावरील दोन तास वाहतूक ठप्प
हिंगोली नांदेड मार्गावरील दोन तास वाहतूक ठप्प

काम लवकर करावे

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गौण खनिजाची वाहतूक झाल्यामुळे रस्ते खड्डेमय झाले असून या ठिकाणी अपघात होऊ लागली आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली.

दोन तास वाहतूक ठप्प

दरम्यान बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. श्रीमनवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार, नाना पोले यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गावकरी व संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर दुपारी बारा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनामुळे हिंगोली नांदेड मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

बातम्या आणखी आहेत...