आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुखाचे वक्तव्य:गद्दारांच्या गाड्या फोडणाऱ्यांचा पक्षप्रमुखांच्या हस्ते सन्मान करू

हिंगोली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोलीत शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्यांच्या गाड्या फोडण्याचे चिथावणीखोर आवाहन शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सोमवारी (१ जुलै) येथे केले. जे पदाधिकारी, कार्यकर्ते गाड्या फोडतील त्यांचा मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली येथील महावीर भवनात शिवसेेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या वेळी थोरात यांनी मार्गदर्शन केले. माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गणाजी बेले, राजू चापके पाटील, संदेश देशमुख, विनायकराव भिसे पाटील, डॉ. रमेश शिंदे, माजी उपसभापती अजय ऊर्फ गोपू पाटील सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या वेळी माजी खासदार सुभाष वानखेडे शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात असताना तत्कालीन संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला. पक्षात राहून त्यांनी गद्दारी केली, असे आ. संतोष बांगर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...