आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार संतोष बांगर शिवसेनेतच:परभणी रेल्वेस्थानकावर जल्लोषात स्वागत; हिंगोली जवळाबाजार, औंढा येथेही कार्यकर्त्यांनी केला सत्कार

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेमध्ये अंतर्गत बंडाळीनंतरही शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहणाऱ्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचा शुक्रवारी सकाळी परभणी रेल्वेस्थानकावर आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांचा सत्कार केला.

शिवसेनेमध्ये मागील काही दिवसांपासून अंतर्गत बंडाळी सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे जात असताना दुसरीकडे शिवसेनेकडे किती निष्ठावंत आमदार राहतात याबाबत तर्कवितर्क लावले जाऊ लागले होते. मात्र, कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मातोश्रीची साथ सोडलीच नाही. या परिस्थितीतही ते शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कायम सोबत राहिले. त्यांच्या या निर्णयाचे हिंगोली जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, आज सकाळी ते मुंबई येथून देवगिरी एक्सप्रेसने परभणी रेल्वेस्थानकावर आल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार बांगर व युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांचा सत्कार करण्यात आली. यावेळी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार, औंढा नागनाथ येथेही त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...