आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:हिंगोलीत किरकोळ वादातून पत्नीची गळफास देत हत्या; डिग्रस कऱ्हाळे येथील घटना

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे पत्नीसोबत शाब्दिक वाद झाल्यानंतर गळ्यावर जोराची लाथ मारली त्यानंतर दोरीने गळा आवळून पत्नीचा खून केल्याची घटना रविवारी ता. 7 सकाळी उघडकीस आली आहे.

हिंगोली ग्रामीण पोलिसांनी आरोपी पतीला तातडीने ताब्यात घेतले आहे. योगीता संतोष कऱ्हाळे (28) असे मयताचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील सोन्ना येथील योगीता यांचा विवाह दहा वर्षापुर्वी डिग्रस कऱ्हाळे येथील संतोष बळीराम कऱ्हाळे याच्या सोबत झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असे अपत्य आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले होते.

दरम्यान, शनिवारी ता. 6 संतोष याची आई दोन लहान मुलांसह नातेवाईकांकडे लग्नाला गेली होती. तर वडिल शेतात कामासाठी गेले होते. त्यामुळे रात्री घरी संतोष व त्याची पत्नी योगिता दोघेच होते. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाले. या वादामध्ये संतोष याने योागिता यांच्या गळ्यावर लाथ मारली. त्यामुळे त्या जमीनीवर कोसळल्या. त्यानंतर त्याने दोरीने योगिता यांचा गळा आवळून खून केला अन रात्रभर मृतदेहाजवळच होता.

दरम्यान, आज सकाळी त्याने सोन्ना येथे योगिता यांच्या माहेरी संपर्क साधून तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मात्र तिचा खूनच झाल्याच्या संशयावरून योगिताच्या माहेरच्या लोकांनी तातडीने हिंगोली ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक मगन पवार, जमादार विकी कुंदनानी, शेख महमद, रामराव चिभडे, जाधव, आकाश पंडितकर यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट दिली.

त्या ठिकाणी योगिताचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही.