आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोल जाऊन पेटत्या काडात पडले:पुरजळ येथे पेटत्या गव्हाच्या काडामध्ये पडून तरुणाचा भाजल्याने मृत्यू

पुरजऴ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथे शेतात पेटवून दिलेल्या गव्हाच्या काडात पडल्याने गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचा परभणी येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात बुधवारी ता. 4 अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. ऋषिकेश विठ्ठल डूबे (22) असे तरूणाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ शिवारामध्ये ऋषिकेश डूबे यांचे शेत आहे. शेतात खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीची तयारी सुरू होती. त्यासाठी शेतात गव्हाचे काड पेटवून देण्यात आले होते. मात्र काड पेटवून देत असतानाच ऋषिकेश यांचा तोल जाऊन पेटत्या काडात पडले.

सदर प्रकार बाजूच्या शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ऋषिकेश यांना पेटत्या काडातून बाहेर काढले. मात्र तोपर्यंत ते गंभीररित्या भाजले गेले. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयाच्या जळीत रुग्ण विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विठ्ठलराव डूबे यांनी आज हट्टा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार अर्ज दाखल केला. यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे, उपनिरीक्षक सतीश तावडे जमादार भुजंग कोकरे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...