आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंगोली येथील रेल्वेस्थानकाजवळ खांबाला एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (२ मे) सकाळी उघडकीस आली. विशाल धारणे (२५, रा. ढऊळगाव, ता. वसमत) असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली येथील रेल्वेस्थानकाजवळ एका तरुणाचा मृतदेह खांबाला दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. मृतदेहाच्या बाजूला एक बॅग ठेवलेली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोनाजी आम्ले, जमादार अशोक धामणे, संजय मार्के, रेल्वे पोलिस विभागाचे विश्वांभर शिंदे, सुनील घुगे, अंकुश बांगर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर मृतदेह विशाल धारणे याचा असल्याचे स्पष्ट झाले. मागील वर्षीच त्याचा विवाह झाला होता. जिंतूर येथील एका फायनान्स कंपनीत तो कामाला होता. त्याची अकोला येथे बदली झाली होती. सोमवारी जिंतूर येथून तो अकोला येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यानंतर त्याने हिंगोली येथे गळफास घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी सायंकाळपर्यंत नोंद झाली नव्हती.
तारेवरील झाडाच्या फांद्या ताेडताना शॉक लागून मृत्यू
केज |घराजवळून गेलेल्या विद्युत तारांवर आलेले फाटे तोडत असताना एका ४४ वर्षीय इसमाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना केज शहरात घडली आहे. उत्तम अंबाजी जाधव असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. केज शहरातील क्रांतीनगर भागातील उत्तम अंबाजी जाधव (४४) यांच्या घराच्या जवळून विद्युत तारा गेल्या आहेत. या विद्युत तारेवर झाडाच्या फांद्या आल्यामुळे उत्तम जाधव हे मंगळवारी दुपारी चार वाजता त्या फांद्या तोडण्यासाठी गेले होते. फांद्या तोडत असताना त्यांना वीजेचा शॉक लागला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. फौजदार आनंद शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.