आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-युक्रेन युद्ध:स्थलांतराच्या यादीत नाव आल्याने हिंगोलीची तरुणी लवकरच मायदेशी परतणार, म्हणाली- इतरही विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलावी

प्रतिनिधी | हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा तीढा कायम असून संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकली आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्राचे अथक प्रयत्न सुरू आहे.

लकरच मायदेशी परतणार हिंगोलीची तरुणी

काही वेळापूर्वीच स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या यादीमध्ये माझे नाव असल्यामुळे लवकरच मायदेशी परतणार आहे. मात्र तब्बल आठ किलोमीटर पायी प्रवास करणे हे आव्हान देखील पेलावे लागणार आहे. या परिस्थितीवर मात करून आपण मायदेशी परतणार असा विश्वास हिंगोली जिल्ह्यातील चोंडी आंबा येथील वैष्णवी जाधव हिने व्यक्त केला आहे.

युक्रेनमध्ये 20 हजारांपेक्षा विद्यार्थी-नागरिक अडकलेले

याबाबत वैष्णवी जाधव हिने दिव्य मराठीशी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले की, मागील तीन वर्षांपासून युक्रेनमधील चेरनिवत्स्यी या शहरांमध्ये ब्युकोविनियन या वैद्यकीय विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आले. युक्रेनमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना अशी परिस्थिती येईल, असे कदापिही वाटले नव्हते. मात्र मागील चार दिवसांमध्ये युक्रेनमधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. युक्रेन देशात सुमारे वीस हजार पेक्षा अधिक विद्यार्थी व नागरिक अडकलेले आहेत.

पुढील काळात मोबाइल टॉवरही मिळेल की, नाही याची शाश्वती नाही

सध्यातरी आमचा भाग सुरक्षित आहे. मात्र सुरक्षितेचे उपाययोजना म्हणून दरवाजे व खिडक्यांपासून लांब राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याशिवाय घराबाहेर न पडण्याचे सूचनाही दिल्या आहेत सध्यातरी मोबाईल टॉवर असल्यामुळे घरच्यांची व इतर मैत्रीणीशी संपर्क होऊ शकत आहे. पुढील काळात मोबाईल टॉवर मिळेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे.

या भागात असलेली युद्धाची परिस्थिती मनावर दडपण आणणारी आहे. मात्र त्यानंतरही आज दुपारी स्थलांतरितांच्या यादीमध्ये आलेले नाव यामुळे दडपण दूर झाले आहे. मात्र भीती कायम आहे. पुढील एक तासांमध्ये सुमारे 240 विद्यार्थ्यांना रोमानिया सीमेजवळ जाऊन त्या ठिकाणी पुढे आठ किलोमीटर पायी प्रवास करावा लागणार आहे. केवळ एक बॅग सोबत असणार आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी खाण्याचे साहित्य व लॅपटॉप एवढे साहित्य घेता येणार आहे. यादीमध्ये नाव आल्यामुळे मायदेशी भारतात परतण्याची आशा निर्माण झाली असून लवकरच आपण भारतात परतणार आहेत असा विश्वास आहे. भारत सरकारने या भागात अडकलेल्या विद्यार्थी व नागरिकांच्या मदतीसाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे वैष्णवी जाधव यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...