आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी:हिंगोलीजवळ भरधाव टेम्पोच्या धडकेत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचा मृत्यू

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरालगत कारवाडी जवळ भरधाव टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. सुधाकर रामराव गीते (४२, रा. भोगाव ता. हिंगोली) असे मयत शिक्षकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील भोगाव येथील सुधाकर गीते हे पाटण येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आज दुपारच्या सुमारास गीते हे कारवाडी रस्त्याने त्यांच्या दुचाकी वाहनावर हिंगोली शहराकडे येत होते. यावेळी हिंगोली शहराकडून अकोला वळण रस्त्याने जाणाऱ्या भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. या अपघातामध्ये गीते यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. दरम्यान मयत गीते यांच्या पश्चात आई पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे.

तर अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे सांगण्यात आले. तसेच टेम्पोमधील चार ते पाच मजूर देखील जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...