आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे बुजवण्याचे काम:एक कोटी खर्चाच्या यावलरोडला १६ महिन्यांतच दुसऱ्यांदा ठिगळ; डांबरीकरणाऐवजी थेट काँक्रिटीकरणाची मागणी

भुसावळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या यावल राेडचे डांबरीकरण, मार्च व एप्रिल २०२१ मध्ये एक काेटी १० लाख रूपयांच्या अर्थसंकल्पीय निधीतून झाले हाेत. या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचा कालावधी तीन वर्षांचा आहे, मात्र १६ महिन्यातच रस्त्यावर दुसऱ्यांदा खड्डे पडले. याबाबत ‘दिव्य मराठी’ने २१ जुलैला वृत्त प्रकाशित केले हाेते. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ ठेकेदारास सूचना केल्या. त्यामुळे यावल रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम गुरूवारपासून सुरू झाले आहे.

यावल राेडवर महात्मा गांधी पुतळा ते तापी नदीपर्यंत खड्डे पडले आहेत. यामुळे या रस्त्याच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवले जात आहेत. यावल राेडच्या डांबरीकरणासाठी दाेन ते तीन वर्षांआड काेट्यावधींचा चुराडा हाेतो. मात्र, अवजड वाहतुकीमुळे पुन्हा पुन्हा रस्त्याची स्थिती बिकट होते. त्यामुळे अवजड वाहतुकीमुळे रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, गुणवत्ता राखली जात नाही बांधकाम विभागाने डांबरीकरणाएेवजी रस्त्याचे काॅँक्रिटीकरण करावे, अशी वाहनधारकांची मागणी आहे.

बातम्या आणखी आहेत...