आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील रेल्वेतील निवृत्त स्टेशन मास्तर आर.एम.पडघन यांचे १ लाख १० हजार रूपये भामट्यांनी आॅनलाइन लांबवले. हेडफोन खरेदीच्या बहाण्याने ही फसवणूक झाली. मंगळवारी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला.पडघन यांनी ७ जुलै २०२२ रोजी माय शॉपिंग डॉट कॉम या अॅपवरून वायरलेस हेडफोन खरेदीसाठी चौकशी केली. नंतर २९९ रूपयांचा हेडफोन बुक केला.
मात्र, आठ दिवस होऊनही हेडफोन प्राप्त न झाल्याने संबंधित अॅपवरील ग्राहक सेवा केंद्रात संपर्क केला. त्यांच्या सूचनेनुसार पूर्वीची आॅर्डर रद्द करून नवीन आॅर्डर करा. पूर्वीच्या आॅर्डरसाठी भरलेले पैसा परत मिळवण्यासाठी सोबत पाठवलेल्या लिंकवर क्लिक करून दिलेला अर्ज भरून आम्हाला पाठवा.
यानुसार पडघन यांनी १६ जुलैला अर्ज भरून देताच अवघ्या १५ मिनिटात त्यांच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यातून ९ हजार ९०० रूपये काढले गेले. यानंतर १७ जुलैला एसबीआयच्या खात्यातून ४९ हजार ९९९, २५ हजार, १५ हजार ४ हजार ५०० असे एकुण पाच व्यवहार झाले. त्यातून १ लाख ९ हजार ३९९ रूपये काढले गेले. पडघन यांनी मंगळवारी बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तसेच संबंधित बँकांमध्ये देखील माहिती देण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.