आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 टक्के निकाल:वढोदे प्र.सावदा विद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल ; मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुणवंतांचे केले कौतुक

फैजपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वढोदे प्र.सावदा येथील सुज्ञा अरूण महाजन शाळेचा निकाल टक्के लागला. सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक दिव्या तुषार गारसे ९५.६० टक्के, द्वितीय क्रमांक मोक्षा चौधरी ९४, आणि गायत्री खाचणे, कौशल्या तेली, दीशा चौधरी यांना प्रत्येकी ९३ टक्के मिळून तिसरा क्रमांक आला. शाळा समिती अध्यक्षा शुभांगी महाजन, सचिव डॉ.सोहन महाजन, मुख्याध्यापक व शिक्षकांनी गुणवंतांचे कौतुक केले.

आमोदे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित घनश्याम काशीराम विद्यालयाचा दहावीचा निकाल ९५.१२ टक्के लागला. तेजल कैलास पाटील ही ९३.६० टक्क्यांसह पहिली, द्वितीय योगिता युवराज सरोदे ९१.६० आणि हेमांगी प्रमोद वाघुळदे ही ९१.२० गुणांसह तिसरी आली. या विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष विनायक पाटील, चिटणीस प्रा. उमाकांत पाटील यांनी कौतुक केले.

बातम्या आणखी आहेत...