आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसाठा:हतनूरमध्ये आठवडाभरातच होणार 100 टक्के जलसाठा

भुसावळ भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हतनूरच्या पूर नियंत्रण आराखड्यानुसार धरणात १० ते १५ ऑक्टोबरदरम्यान १०० टक्के साठा केला जातो. यंदाही १ ऑक्टोबरला ९७ टक्के साठा झाला. त्यामुळे आठवडाभरात धरण १०० टक्के भरेल. यामुळे धरणावर अवलंबून असलेली ११० गावे-शहरे, प्रकल्प व औद्योगिक वसाहतींना वर्षभर मागणीनुसार पाणी मिळेल. हतनूर धरणात यंदाही वेळेत जलसाठा होईल. शनिवारी (दि.१) धरणात ९७ टक्के साठा होता. नियोजनानुसार येत्या आठ दिवसांत तो १०० टक्के होईल. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे सध्या दररोज ८ ते १० हजार क्युसेक पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे दोन दिवसांत शंभरी गाठली जाईल.

तीन दिवस पावसाचा अंदाज : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आगामी तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. हा पाऊस होऊन पाण्याची आवक वाढल्यास आणि धरणाचे दरवाजे बंद ठेवल्यास ते केवळ ७ तासांत भरेल. मात्र, पूर व्यवस्थापन नियमानुसार १० ऑक्टोबरपर्यंत जलपातळी २१४ मीटर करुन १०० टक्के साठा गाठला जाईल, असे शाखा अभियंता एस.जी.चौधरी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...