आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वस्त धान्य दुकानदार:भुसावळ येथील 100 रेशन दुकानदार दिल्लीतील आंदोलनात सहभागी होणार

भुसावळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे या परवानाधारकांनी देशव्यापी आंदोलन सुरु केले आहे. त्यात २ ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन होईल. या आंदोलनासाठी भुसावळ शहर व तालुक्यातील १०० रेशन दुकानदार सोमवारी रवाना झाले.

एलपीजी गॅस संदर्भात स्वस्त धान्य दुकानदारांना दुकानांतर्गंत रेशनकार्डवर सिलिंडरची विक्री, नोंदणी करण्याची परवानगी द्यावी व कमिशन ठरवावे या मागण्यांसाठी हे आंदोलन होईल. त्यात सहभागासाठी सोमवारी भुसावळातील १०० रेशन दुकानदार रवाना झाले. राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, सुनील अंभोरे, महेंद्र सपकाळे, कैलास उपाध्याय, सी.आर.पाटील, उल्हास भारसके यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...