आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पशु लसीकरण:पशुधनाच्या लसीकरणासाठी स्वखर्चाने उपलब्ध करून दिले एक हजार डोस

सावदा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावदा परिसरातील पशुधनावर लंपी स्कीन डिसिज प्रादुर्भाव वाढता आहे. यामुळे पशुपालक चिंतेत आहे. दुसरीकडे पशुसंवर्धन विभागाने लसीकरण सुरू केले आहे. मात्र, पुरेशा प्रमाणात लसीचे डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे मनीष पाटील व मित्र परिवाराने येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाला स्वखर्चाने १ हजार डोस स्वखर्चाने उपलब्ध करुन दिले.

लसींचा हा साठा सावदा येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाकडे सोपवण्यात आला. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नीलेश राजपूत, सहायक आयुक्त संजय धांडे, सुरेश चौधरी, जगदीश बढे, कुशल जावले, पंकज येवले, अजय भारंबे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

पिंपरुड ग्रा.पं.ने केले ५५० जनावरांचे लसीकरण
फैजपूर । परिसरात पशुधनावर लंपी स्कीन डिसिजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबिका दूध डेअरी २ हजार जनावरांचे लसीकरण करणार आहे. सोमवारपासून जि.प.चे पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ.संतोष बढे, शहरातील डॉ.नितीन इंगळे हे लसीकरण करतील, अशी माहिती अंबिका दूध डेअरीचे चेअरमन हेमराज चौधरी, नितीन राणे यांनी दिली. शनिवारी पिंपरुड गावात ग्रामपंचायतीने ५५० जनावरांचे लसीकरण केले.

बातम्या आणखी आहेत...