आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेऱ्या रद्द:कोळसा पुरवठ्यासाठी रेल्वेच्या 1,081 फेऱ्या रद्द, उत्तर रेल्वेमध्ये मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या 20 व पॅसेंजर गाड्यांच्या 20 फेऱ्या रद्द

नवी दिल्ली / भुसावळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजेची वाढती मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांत कोळशाचा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वे बोर्डाने मोठ्या प्रमाणात प्रवासी रेल्वे रद्दचा निर्णय घेतला आहे. कोळसा पुरवण्यात जास्त वेळ लागू नये, यासाठी २४ मेपर्यंत विविध रेल्वेगाड्यांच्या १,०८१ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र यात महाराष्ट्रातील एकाही गाडीचा समावेश नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेद्वारे सर्वाधिक कोळशाची वाहतूक केली जाणार आहे. याच रेल्वे विभागात सर्वाधिक वीज केंद्रे आहेत. या क्षेत्रात रेल्वेगाड्यांच्या १,०४१ फेऱ्या रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वेमध्ये मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या २० व पॅसेंजर गाड्यांच्या २० फेऱ्या रद्द केल्या गेल्या.

बातम्या आणखी आहेत...