आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खटले निकाली:फैजपुरातील फिरत्या लोकन्यायालयामध्ये 11 खटले निकाली

फैजपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील पोलिस ठाण्याच्या आवारात विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मंगळवारी फिरते लोकन्यायालय उपक्रम पार पडला. त्यात ११ खटले निकाली काढण्यात आले. २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

महिलांचे विविध कायदेशीर अधिकार, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदेविषयक जनजागृती, बेटी बचाव बेटी पढावचा प्रचार-प्रसार करणे, असंघटित कामगारांचा हक्क, देह व्यापाराला बळी पडलेल्या महिला, मुलींना मिळणारी कायदेशीर मदत, कौटुंबीक कायदा, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले कायदे, याविषयी न्यायाधीश व्ही.एस.डामरे यांनी मार्गदर्शन केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर, अॅड.डी.सी.सावकारे, अॅड. किशोर सोनवणे, अॅड.व्ही.एम.परतणे, सरकारी वकील फरिद शेख, अॅड.आकाश चौधरी, अॅड.धीरज चौधरी, अॅड.नीलेश मोरे, अॅड.यू.सी.बडगुजर, अॅड.हेमांगी चौधरी, अॅड.सुलताना तडवी, अॅड.संगीता तडवी, अॅड.गोविंद बारी, अॅड.रियाज पटेल, अॅड.नितीन चौधरी, अॅड. मधुकर सुरळकर, पीएसआय मोहन लोखंडे, मकसूद शेख, गणेश गुरव उपस्थित होते. सी.एम.झोपे, डी.ए.गावंडे, गजानन लाड, नीलेश राजपूत, एल.एल.तेलंग, एस. बी.शुक्ल यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

यांनी केले मार्गदर्शन सरकारी वकील फरिद शेख, अॅड.आकाश चौधरी,अॅड.के.डी.सोनावणे, अॅड.गौरव पाटील, अॅड.सुलताना तडवी, अॅड. सुरळकर यांनी वेगवेगळे कायदे, त्यानुसार असलेल्या तरतुदींबाबत उपस्थितांना माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...