आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरपीएफने नियमित गस्तीदरम्यान जळगाव ते मनमाड दरम्यान कर्नाटक एक्स्प्रेसमधून सव्वा लाख रुपयांचा गांजा पकडला. शुक्रवारी (दि.२) सायंकाळी साडेपाच वाजता ही कारवाई झाली. समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी (वय ६२, शफीनगर, मालेगाव, जि.नाशिक) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.संशयित समशोद्दीन ऐनोद्दीन पिंजारी हा १२६२८ अप कर्नाटक एक्स्प्रेसच्या कोच क्रमांक एस-३ मधून शुक्रवारी जळगाव ते मनमाड प्रवास करत होता. रेल्वे सुरक्षा बलाच्या गस्ती पथकाला जळगाव-शिरसोलीदरम्यान संशय आल्याने त्यांनी पिंजारी यांच्याकडील बॅगेत काय आहे? अशी विचारणा केली.
यावेळी प्रवाशाने त्यात पालापाचोळा असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे पथकाचा संशय अधिक बळावला. बॅगेची झडती घेतल्यानंतर त्यात सम्राट डिलक्स मिरची पावडर लिहिलेली पिशवी आढळली. या पिशवीत गुंडाळलेला सुमारे १२ किलो ३९ ग्रॅम वजनाचा १ लाख २० हजार १९० रुपयांचा गांजा तसेच पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख २५ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरपीएफ उपनिरीक्षक समाधान वाहुळकर यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसांत फिर्याद दिली. मात्र, गुन्ह्याचे कार्यक्षेत्र जळगाव असल्याने हा गुन्हा भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला. तपास निरीक्षक विजय घेर्डे करत आहेत. दरम्यान, यापूर्वी देखील भुसावळ स्थानकावर गांजा पकडला होता. त्याच्या मास्टर माइंड अजून सापडलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.