आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:12 प्रलंबित मागण्यांसाठी दिव्यांग‎ बांधवांचे यावल तहसीलला निवेदन‎

यावल‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासन निर्णयानुसार दिव्यांग‎ बांधवांसाठी घेतलेल्या विविध १३‎ निर्णयांची प्रशासकीय पातळीवर‎ अंमलबजावणी करावी या‎ मागणीसाठी दिव्यांग पुनर्वसन‎ संस्थेने यावल तहसील कार्यालयात‎ निवेदन दिले.‎

निवासी नायब तहसीलदार संतोष‎ विनंते यांच्याकडे हे निवेदन देण्यात‎ आले. त्यात शासन निर्णयानुसार‎ दिव्यांग महिला बचत गटांना‎ सहाय्यक अनुदान देणे, दिव्यांगांना ५‎ टक्के निधी वितरण, ३५ किलो‎ धान्य, विनाअट घरकुल देणे,‎ घरकुल आराखड्याअंतर्गत विशेष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सुविधेसाठी २० हजार रुपयांची‎ मदत, दिव्यांगांना मालमत्ता करामध्ये‎ ५० टक्के सवलत, दिव्यांग व्यक्तींना‎ विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान,‎ दिव्यांगांना वीज, नळ व झोपडपट्टी‎ दुरुस्तीसाठी अनुदान, दिव्यांग‎ महिलांच्या सक्षमीकरण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ योजनांसाठी अर्थसाहाय्य, घरकुल‎ मंजुरी, शासकीय कार्यालयांमध्ये‎ रॅम्पची व्यवस्था अशा मागण्या‎ आहेत. संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय‎ कोळी, जयंत पाटील, महेश बारी,‎ किशोर राजपूत, किशोर कोळी,‎ राजू कोळी आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...