आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराक्रांतीसुर्य महाराणा प्रताप यांच्या ४८२ व्या जयंतीचे औचित्य साधून, शहरात तीन व पाच किमी अंतराच्या चेतन रनचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. त्यामध्ये १२०० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. या चेतक रनमध्ये ५ वर्षाच्या बालकापासून ते ७७ वर्षांच्या ज्येष्ठांनीदेखील सहभाग नोंदवला. या रनमध्ये भुसावळ स्पोर्टस् अँड रनर असोसिएशनच्या महिला धावपटू नऊवारी साडीत सहभागी झाल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पहाटे ५.३० वाजेपासून धावपटूंची गर्दी झाली. तीन व पाच किमी अंतराच्या स्पर्धेत, पहाटेच्या गारव्यामुळे स्पर्धकांचा उत्साह वाढला. मैदानावर एकत्र आलेल्या स्पर्धकांसाठी सकाळी ६ वाजता झुम्बा डॉन्सचे आयोजन झाले. स्पर्धेदरम्यान लोखंडी पुलाखाली पाणी साचले होते. त्या पाण्यातूनच स्पर्धकांना वाट काढावी लागली. पालिकेने स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधीच ही समस्या सोडवणे अपेक्षित होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्पर्धकांची गैरसोय झाली. खासदार उन्मेष पाटील, संजय सावकारे यांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाच्या आयोजकांचे कौतूक केले.
स्पर्धकांना टी-शर्ट, पदक प्रवीण पाटील यांनी आयोजन समितीचे प्रमुख रणजितसिंग राजपूत यांनी केलेल्या कामांची माहिती दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.