आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन:बऱ्हाणपूर प्रवासासाठी 14 जादा बसेस‎

भुसावळ‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथे प्रदीप मिश्रा‎ यांची शिव पुराण कथा सुरू आहे. ही कथा‎ श्रवणासाठी भुसावळ शहरातून शेकडो‎ भाविक ये-जा करत आहे. दरम्यान, या‎ भाविकांच्या सोयीसाठी भुसावळ बस‎ स्थानकातून दिवसभरात १४ बस साेडण्याचे‎ नियोजन महामंडळाने केले आहे. सकाळी‎ ६ वाजेपासून प्रत्येक तासाला बस साेडली‎ जाणार आहे. भाविकांची संख्या वाढल्यास‎ त्यात अजून वाढ होऊ शकते.

सुरक्षित‎ प्रवासासाठी बऱ्हाणपूर येथे जाणाऱ्या‎ भाविकांनी बससेवेचा लाभ घ्यावा. तसेच‎ भुसावळातून बऱ्हाणपूरला जाणाऱ्या‎ भाविकांची संख्या वाढल्यास जादा बसेस‎ सोडू अशी माहिती आगार प्रमुख प्रमाेद भाेई‎ यांनी केले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...