आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:मिरवणूक मार्गाला जोडणारे 14 रस्ते आज रहदारीस बंद; रात्री 12 पर्यंत वेळ नदी काठावर लावले हॅलोजन

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विघ्नहर्त्या गणरायाला शुक्रवारी (दि.९) वाजतगाजत निरोप देण्यात येईल. यासाठी सार्वजनिक मंडळांसह पोलिस व पालिका प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दुपारी १२ वाजता नृसिंह मंदिरापासून सुरुवात होणाऱ्या मुख्य विसर्जन मिरवणुकीत ४१ मंडळांचा समावेश असेल.

या मंडळांना रात्री १२ पर्यंत विसर्जन करावे लागेल. दरम्यान, मुख्य मिरवणूक मार्गावरील नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्स पर्यंतच्या मार्गाला जोडणारे तब्बल १४ उप रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात येतील. तर गवळी वाडा, मामाजी टॉकीज मार्ग, आराधना कॉलनी ते टिंबर मार्केटला जोडणाऱ्या रस्त्यांवर एकेरी मार्ग असेल. त्यामुळे इतर मोठ्या वाहनांना थेट यावल रोड, जळगाव रोडवर, महामार्गावरून नाहाटा चौफुलीमार्गे मुख्य शहरात येता येईल.

या उपरस्त्यांवरून मिरवणूक मार्गावर येणे टाळा मुख्य मिरवणूक मार्गावरील नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्सपर्यंतच्या मार्गाला जोडणारे जे १४ उप रस्ते बंद असतील त्यात शाळा क्रमांक ५कडे जाणारा रस्ता, भास्कर मार्केट, शनीमंदिर वॉर्डाला जोडणारे तीन रस्ते, अप्सरा चौकातून व्हीएम वॉर्डाला जोडणारा मार्ग, गणेश मॉलपासून शनीमंदिर वॉर्डला जोडणारा वखार मार्ग, मरिमाता मंदिर व्ही वॉर्डला जोडणारा रस्ता, जामा मशिद लक्ष्मी चौकातील राम मंदिर वॉर्ड व खाल्लमा दर्गा भागाला जोडणाऱ्या दोन्ही उप रस्त्यांचा समावेश आहे. सराफ बाजारातून ओसवाल पंचायती वाडा, भजे गल्लीला जोडणारा रस्ता, मॉडर्न फोटोपासून चिरा गल्लीला जोडणारा मार्ग, जनता टॉवरपासून इस्कॉन मुरलीधर मंदिराला जोडणारा रस्ता देखील बंदच असेल.

तापीवर या ठिकाणी पार्किंग सुविधा... घरगुती गणेश विसर्जनासाठी तापी नदीवर येणाऱ्या भाविकांना आपली चारचाकी, दुचाके वाहने स्मशानभूमी समोरील भाग, राहुलनगर समोरील भाग, वन विभागाचा तपासणी नाका आदी ठिकाणी उभी करता येतील. तशी व्यवस्था केलेली आहे.

बातम्या आणखी आहेत...