आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:भुसावळात रस्ते पुलांसाठी 15 कोटी 30 लाख रूपयांचा निधी मंजूर

भुसावळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ तालुक्यातील चार प्रमुख रस्त्यांसाठी १० कोटी, तर नाबार्ड अंतर्गतच्या कामांसाठी ५ कोटी ३० लाख असा एकूण १५ कोटी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार संजय सावकारे यांच्याकडून ही माहिती कळवण्यात आली आहे.

हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यातून या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यातून भुसावळ वळणरस्त्यासह सुसरी ते पिंपळगाव खुर्द रस्ता, कोटी, सुसरी गावात काँक्रिटीकरण, खडका ते किन्ही रस्ता व बोदवड वळण रस्त्यासह हतनूर ते टहाकळी रस्ता या चार कामांसाठी प्रत्येकी अडीच कोटी रुपये मंजूर झाले. यासोबतच नाबार्ड २८ अंतर्गत सुसरी गावाजवळ राज्य मार्गावर पुलाचे बांधकाम करणे १ कोटी, वेल्हाळे गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे ८० लाख, बोहर्डी गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे १ कोटी ५० लाख, फुलगाव गावाजवळ पुलाचे बांधकाम करणे २ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

बातम्या आणखी आहेत...