आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:प्रसाद स्वरुपात गणेशभक्तांना उत्सवामध्ये वाटणार १५०० रोपे

भुसावळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रिंगरोडवरील बल्लाळेश्वर चौकातील युवा संकल्प प्रतिष्ठान यंदा पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. त्यात मंडळाकडून गणेश भक्तांना १५०० रोपटे प्रसाद रुपाने वाटण्यात येतील. उन्हाळ्यात भुसावळचे तापमान उच्चांकी असते. वृक्ष लागवडीतून ते नियंत्रणात येण्यासाठी हा खारीचा वाटा उचलण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.कोरोना काळात मंडळाने परिसरात सॅनिटायजेशन केले. रोजगार गमावलेल्या व घरात अन्नाचा दाणा नसलेल्या अत्यंत गरजू कुटुंबांना शिधा वाटप केले. रेल्वे स्थानकावर परप्रांतीय प्रवाशांना अन्न दानासाठी पुढाकार घेतला. यानंतर गेल्या वर्षी २०२१ च्या गणेशोत्सवात मंडळाने परिसरात वृक्षारोपण केले.

यंदा देखील गणेशभक्तांना प्रसाद स्वरुपात दीड हजार रोपट्यांचे वितरण करण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी अध्यक्ष मिलिंद धांडे, उपाध्यक्ष दीपक चौधरी, खजिनदार यशवंत बढे, सचिव संदीप जाधव, कार्याध्यक्ष राजू नेहेते, सदस्य सागर झांबरे, नितीन कोळी, विशाल अत्रे, खुशाल जोशी, रुपेश पाटील, तेजस आत्रवळकर, भारत रोडे, विक्की चौधरी, सनी चौधरी, इश्वर भोई, लोमेश कुरकुरे सक्रिय आहेत.

लोकल वॉर्मिंग कमी करण्याचा प्रयत्न
उन्हाळ्यात शहराचे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचते. हे लोकल वार्मिंग कमी होण्यासाठी यंदा आम्ही गणेशभक्तांना विविध झाडांची दीड हजार रोपे प्रसाद स्वरुपात वाटणार आहोत. वृक्षलागवडीतून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत आहोत.
नीलेश चौधरी, संस्थापक अध्यक्ष, युवा संकल्प प्रतिष्ठान, भुसावळ

बातम्या आणखी आहेत...