आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑईल व्यवसाय:बायाेकेमिकल ऑइलच्या बदल्यात 16 लाखांचा गंडा ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बायाेकेमिकल ऑईलचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कंपनी दोन जणांच्या बँक खात्यावर १६ लाख रूपये टाकले. यानंतर ऑइल दिले नाही. पैसे परत देण्यास टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी सूरत येथील दोन जणांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

येथील हॉटेल व्यावसायिक सारंगधर महादेव पाटील उर्फ छाेटू ढाबेवाले यांना बायाेकेमिकल ऑईलचा व्यवसाय सुरू करायचा हाेता. यासाठी त्यांनी सूरत येथून आलेल्या कंपनीच्या हिरेन ताेमर व राकेश (पूर्ण नाव माहिती नाही) दाेन एजंटसोबत चर्चा केली. दाेघांना २० लाख रुपयांच्या ऑइलची आॅर्डर दिली. त्यापैकी १६ लाख रूपये दोघांच्या बँक खात्यावर टाकले. ही घटना ३ डिसेंबर २०२१ रोजी घडली. यानंतर पाटील यांनी हिरेन व राकेशकडे वारंवार ऑइलची मागणी केली. मात्र, गाडी निघाली आहे, गाडी खराब झाली आहे, उद्या माल पाठवताे असे उत्तरे देऊन टाळाटाळ झाली. शेवटी पाटील यांनी पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र, त्याचा उपयोग न झाल्याने व दोघांनी कराराचा भंग केल्याने सारंगधर पाटील यांनी शनिवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात निरीक्षक राहूल गायकवाड यांची भेट घेतली. यानंतर तक्रार देत हिरेन ताेमर व राकेश यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.तपास हवालदार गाेपाळ गव्हाळे करत आहे.

बातम्या आणखी आहेत...