आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचवार्षिक निवडणुक:तापी सहकारी सूतगिरणीसाठी 163 जणांचे उमेदवारी अर्ज

चोपडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील तापी सहकारी सूतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २१ जागांसाठी तब्बल १६३ उमेदवारी अर्ज दाखल झाले.कापूस उत्पादक मतदार संघात एकूण १५ जागांसाठी १०० तर बिगर कापूस उत्पादक मतदार संघात एका जागेसाठी १२, इतर मागासवर्गीय मतदार संघात एका जागेसाठी २३, महिला राखीव मतदार संघात दोन जागेसाठी एकूण १५, अनुसूचित जाती जमाती एका जागेसाठी ६, भटक्या विमुक्त एका जागेसाठी ७ असे एकूण १६३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांची ७ रोजी दुपारी १२ वाजता सूतगिरणीच्या चोपडा शहरातील कार्यालयात छाननी होणार आहे. तर ९ ते २३ नोव्हेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत अाहे.

बातम्या आणखी आहेत...