आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:कंपाउंडरने चोरलेली 1.68  लाखांची सोनसाखळी परत

भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावर २० सप्टेंबरला रात्री राजस्थान मार्बलसमाेर अपघात झाला होता. त्यात जखमी प्रथम टेवानी याला रूग्णवाहिकेतून नेताना संशयित कंपाउंडर राजू माेतीराम सुरवाडे याने गळ्यातील ३३ ग्रॅम वजनाची १ लाख ६८ हजार रूपये किमतीची साेन्याची चेन लांबवली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पाेलिसांनी संशयीत सुरवाडे यांच्याकडून चाेरीतील सोन्याची साखळी जप्त केली.

न्यायालाच्या माध्यमातून मंगळवारी ही साखळी टेवानी यांना परत मिळाली. अर्जदारातर्फे अॅड. सत्यनारायण पाल, तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील भागवत पाटील यांनी काम पाहीले. हवालदार रमण सुरळकर पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...