आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संक्रमण रोखणार:17 हजार बालकांचे सर्वेक्षण करून देणार गोवरची लस, आरोग्य विभाग राबवणार दोन टप्प्यात मोहीम

भुसावळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोवरची वाढती रुग्णसंख्या पाहता रेल्वेमुळे थेट मुंबईसोबत कनेक्ट असलेल्या भुसावळात खबरदारी घ्यावी अशा सूचना होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार १५ ते २६ डिसेंबरदरम्यान, ९ महिने ते पाच वर्षांच्या बालकांचे सर्वेक्षण करून लसीकरण केले जाणार आहे.राज्यात गोवरची वाढती रुग्णसंख्या पाहता जळगाव जिल्ह्यात गोवरचा उद्रेक होऊ नये, लसीकरणाअभावी कोणत्याही बालकाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी नुकतीच गोवरबाबत टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यात २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना आराेग्य विभागाला दिल्या. त्यासाठी आरोग्य पथक घरोघरी सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्या बालकांना लस देईल. भुसावळ शहरात हे काम पालिकेच्या आराेग्य विभागातर्फे होईल. यासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण व लसीकरण १५ ते २६ डिसेंबर, तर दुसरा टप्पा १५ ते २६ जानेवारी या काळात हाेईल. या माध्यमातून शहरातील गोवरचे संक्रमण रोखण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे. त्यात यश गाठण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियोजन करत आहेत.

यांनी नुकतीच गोवरबाबत टास्क फोर्सची बैठक घेतली. त्यात २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना आराेग्य विभागाला दिल्या. त्यासाठी आरोग्य पथक घरोघरी सर्वेक्षण करून लसीकरण न झालेल्या बालकांना लस देईल. भुसावळ शहरात हे काम पालिकेच्या आराेग्य विभागातर्फे होईल. यासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण व लसीकरण १५ ते २६ डिसेंबर, तर दुसरा टप्पा १५ ते २६ जानेवारी या काळात हाेईल. या माध्यमातून शहरातील गोवरचे संक्रमण रोखण्याचे आरोग्य विभागाचे नियोजन आहे. त्यात यश गाठण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियोजन करत आहेत.

सामान्य ताप असला तरी घेता येईल लस
सर्दी, ताप, खोकला असला तरी अनेक पालक मुलांना लसीकरणासाठी घेऊन जात नाही. परिणामी काही दिवसांनी लसीकरणाचा विसर पडून साखळी ब्रेक होते. यामुळे पाल्याच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होत नाही. सामान्य सर्दी, खोकला व कमी प्रमाणात ताप असताना लस घेतली तर कोणतीही अडचण येत नाही. गोवर रोखण्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. -डॉ.कीर्ती फलटणकर, वैद्यकीय अधिकारी, पालिका

भुसावळ शहरात १७ हजार बालके
भुसावळ शहरात ९ महिने ते ५ वर्षे वयोगटाची १७ हजार बालके आहे. दरराेज पाच हजार घरांचे सर्वेक्षण आशा वर्कर, नर्स करणार आहे. पाच हजार घरांच्या सर्वेक्षणातून किमान एक हजार बालके लसीकरणाविना असल्याचे समोर येऊ शकते असा अंदाज आहे. त्यानुसार लसीकरण करण्यात येईल. त्यात एकही बालक लसीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...